बेकरी प्रॉडक्टस

५. एअर फ्रायरमधला ब्रेड
साहित्य:
250 ग्रम मैदा
1 च ड्राय यिस्ट 
200 मिली पाणी
4-5 च दूध
2 च तेल
छोटा च मीठ
शेवटी चमचाभर साजूक तूप

कृती
पाणी कोमट करून त्यात यिस्ट, साखर टाकून मिक्स केलं.
बाऊलमधे सगळे साहित्य एकत्र करून स्पॅच्युलाने नीट मिक्स केलं. सगळं जरा सैलसरच होतं. सो हात नाही घालायचा😅
सगलं नीट मिक्स झालं की स्पॅच्युलानेच जरा मळल्या सारखं करून गोळा करायचा. बाऊलवर प्लॅ पेपर लावून वरून नॅपकिन ठेवून वर ताटली ठेव.
तासभर बघू नको त्याकडे😁
तोवर ए एफ्रा च्या भांड्याहून लांबीत जरा जास्त मोठा बटरपेपर घे. मधे डबल फोल्ड करून दोन कंपार्टमेंट होतील असं कर. ब पे ला खाली जरा तेलाचा हात लावून तो भांड्यात प्लेस कर. सो दोन आयत तयार होतील. 
आता ताटली, नॅपकीन, प्लॅ पेपर काढून  पुन्हा स्पॅच्युलाने जरा मळ. दोन भाग कर. थोडं तेल टाक. सो बाऊलमधून न चिकटता बाहेर निघेल. आता एक भाग बाहेर काढून पोळपाटावर जरा लांबूळका आकार दे अन एफ्रा मधे एका कंपार्टमेंट मधे ठेव. आता दुसराही तसा कर.  सगळं ए फ्रा मधे ठेव पण एफ्रा चालू करू नको. अर्धातास तसच राहू दे. 
नंतर 180 वर 15-20 मि ठेव.
झालं की बाहेर काढ पण हलवू नको. 5 मि नी ब पेपर बाहेर काढ. हलकेच ब्रेड पेपरवरून सुटा कर. आता दोन्ही उलटे, खालची बाजू वर करून डायरेक्ट ए फ्रा च्या बास्केटमधे ठेव. पुन्हा अगदी 3-4 मि एफ्रा लाव.
झालं की ब्रेड बाहेर काढ. चाळणीवर ठेव. गरम असतानाच अर्धा अर्धा चमचा साजूक तूप दोन्ही ब्रेडला सगळीकडून चोपड.
यामुळे ब्रेड सॉफ्टही हेतो अन एक मंद चव, सुवास ब्रेडला येतो. वर चाळणी उपडी घालून  नॅपकीने झाकीन ठेव.
15-20 मिनिटांनी बाहेर काढ. गार झाला की धारधार सुरीने जोर न लावता हळूहळू स्लाईस काप.

हे अगदी सेम टू सेम फॉलो कर. होईलच मस्त ब्रेड😃




४.स्टफ्ड बन्स (कणकेचे)

*साहित्य*
बन साठी:
4. स्टफ्ड बन्स

२०० ग्रॅम कणीक
एक चमचा ड्राय यिस्ट
१ चमचा साखर
अर्धाकप कोमट दुध
अर्धाकप कोमट पाणी
पावचमचा मीठ
२ चमचे तेल
शेवटी वरून लावायला साजूक तुप अर्धा चमचा

स्टफिंगसाठी:
कोबी बारीक किसलेला २ चमचे
एक बटाटा उकडून मॅश करून
एक कांदा बारीक चिरून
सिमला मिरची बारीक चिरून २ चमचे
चिज किसून २ चमचे
मीरपूड मीठ चवीप्रमाणे
(यात अजून हव्या त्या भाज्या वापरू शकाल। फ्लॉवर गाजर मटार मकादाणे कांदापात। फक्त बारीक चिरावं सो नीट शिजतं)

*कृती*
कपात कोमट दुध घेऊन त्याच यिस्ट आणि साखर घालून मिक्स करून ५ मिनिटं ठेवलं।
बाऊलमधे कणीक, मीठ घेऊन मधे खळगा करून त्यात दुध यिस्ट साखर मिक्श्चर टाकलं। कोमट पाणी लागेल तसं घालून अगदी मऊ भिजवलं। (नेहमी चपातीला भिजवते त्याहून बरच मऊ, पांतळ) तेल टाकून मळून घेतलं। २५ मिनिटं झाकून ठेवलं।
गोळा साधारण डबल झालेला। तो पुन्हा तेलाचा हात लाऊन मळला। पुन्हा २०-२५ मिनिटं झाकून ठेवला।
तोवर स्टफिंगचे साहित्य एकत्र करून जरा मळून घेतलं। आणि त्याचे ८ गोळे करून घेतले।
ओव्हनच्या गोल पात्राला तेलाचा हात लाऊन घेतला।
२० मिनिटांनी कणकेचा गोळा पुन्हा मळून घेतला। त्याचे ८ भाग केले।
एक भाग कणीक हाताने पसरवून पुरीसारखी केली त्यात स्टफिंगचा गोळा ठेवला आणि पुरणपोळीचा उंडा करतो तसा करून ओव्हन पात्रात ठेवला। बाकीचे ७ उंडेही केले अन थोडं अंतर ठेऊन पात्रामधे ठेवले। त्यावर रुमाल टाकून झाकून ठेवले। 

१० मिनिटांनंतर
ओव्हन १८० डि से। ला १० मि तापवत ठेवला।
ओव्हन तापल्या नंतर (१० मिनिटं झाल्यावर) पात्रावरील झाकण रुमाल काढून ते ओव्हनमधे ठेवले। २० मिनिटं १८० सें ग्रे ला बेक केले।
५ मिनिटं तसच ओव्हनमधे राहु दिले। मग काढून वरून तुपाचा हलका हात फिरवला। १० मिनिटांनी गार झाल्यावर सूप बरोबर सर्व्ह केला।


--------

3. सोपा केक 
हा सोपा, झटपट केक माझ्या लेकाला शिकवला, अन त्याला जमला. म्हणून ही रेसिपी टाकतेय.

१. ओव्हन 170 डिग्रीला 10 मिनिटं प्रि हिट करत ठेवायचा.

२. ओव्हन प्रिहिट होतोय तोवर, मिक्सरच्या भांड्यात : तीन अंडी, 150 ग्रॅम मैदा, 125 ग्रॅम पीठी साखर, 100 ग्रॅम लोणी, एक चमचा बेकिंग पावडर, दोन चमचे कोको पावडर, चार पाच तुकडे कॅडबरीचे घ्या. सगळं मिक्सरमधे फिरवायचं. बॅटर तयार.

३. केकच्या भांड्याला लोणी लाऊन मैद्याचे डस्टिंग करायचे.

४. बॅटर केकच्या भांड्यात ओता.  आता पर्यंत ओव्हन प्रिहिट झाला असेल. त्यात हे भांड 20 मिनिटं 170 डिग्रीवर बेक करायला ठेवा. ( सगळी भांडी धुवून ठेवा. ओटा पुसा. तोवर...)

५. टुंग झालं की 150 ला पाच मिनिटं ठेवायचं. पाट मिनिटं ओव्हनमधेच ठेवायचा.( भांडी पुसून जागेवर जाऊ देत. आता...)

 केक सांभाळून बाहेर काढून गार होऊ द्यायता. भूक लागली की सगळीकडून सुरीने सोडवून घ्यायचा. नीट कापून खायला घ्यायचा.

झटपट,इझी केक तयार


कंसातल्या टिपी खास नवीन कुक्स साठी  ;)

—----------

2. नानकटाई
साहित्य
150 ग्रॅम मैदा
100 ग्रॅम लोणी
100 ग्रॅम पिठीसाखर
अर्धा चमचा बेकिंग पावडर
पाव चमचा मीठ
चिमुटभर जायफळ पूड
चिमुटभर दालचिनी किंवा वेलची पूड

कृती :
प्रथम मैदा, बेकिंग पावडर, पिठीसाखर, मीठ जायफळ पूड, दालचिनी/ वेलची पूड सगळे एकत्र करून दोन तीनदा चाळून घ्यावी.
आता त्यात रूम टेंपरेचरचे लोणी घालावे. हलक्या हाताने सगळे एकत्र करावे. लागला तर थोडा मैदा मळताना घालावा. अगदी सैलसर गोळा तयार करा.
आता हा गोळा प्लॅस्टिक पिशवीत ठेऊन झाकून ठेवा.
10मिनिटं झाली की ओव्हन (ओटीजी) 150 डिग्री ला प्री हिट करत ठेवा.
10मिनिटांनी बेकिंग ट्रेला फॉईल लावा. भिजवलेल्या गोळ्याचे मोठ्या पेढ्याच्या आकाराचे गोळे करा. या प्रमाणात साधारण 12-15 नानकटाईज होतील. हातावर गोल आकार द्या. छान गुळगुळीत झाले पाहिजेत. आता थोडा दाब देऊन ट्रेमधे थोडे अंतर सोडून ठेवा.
आता ओव्हनचे टेंपरेचर 125करून 15 ते 20 मिनिटं बेक करा. 15 मिनिटांनी बघा वरून पांढऱ्याच दिसतील पण खालून बघा. गोल्डन रंग झाला असेल तर बाहेर काढून गार होऊन द्या.

तयार आहेत खुसखुशीत नानकटाई ☺


—----------—

1.  ब्रेड


साहित्य
मैदा 500ग्रॅम
पाणी 340मि लि
फ्रेश यिस्ट 10ग्रॅम
तेल एक चमचा
मीठ एक चमचा
साखर दोन चमचे
भरपूर पेशन्स :-D 

कृती
खूप मोठ्या बाऊल मधे पाणी, यिस्ट, साखर , मीठ सगळे एकत्र करा. यिस्ट, साखर नीट एकत्र करा. आता त्यात मैदा टाका. एकत्र करा. सैलसर गोळा तयार होईल. 


आता मोठ्या परातीत मैदा भुरभुरवा त्या हा गोळा घ्या. मैदा हाताला लाऊन मळून घ्या. जेव्हढे जास्त मळाल तेव्हढा ब्रेड छान होईल. मळण्याची पण एक विशिष्ठ पद्धत आहे. जोर न लावता गोळा परसवायचा अन मग तो फोल्ड करून एकत्र करायचा. जास्तीत जास्त हवा त्यात घुसली पाहिजे. 
आता हा गोळा पुन्हा बाऊलमधे ठेऊन दहा मिनिटं झाकून ठेवा. आधी एखादे ओले फडके बाऊलवर घाला मग त्यावर ताट उपडे टाका. 
दहा मिनिटाने गोळा पुन्हा परातीत घ्या. गोळ्याला जाळी सुटायला सुरुवात झाली असेल. पुन्हा मैद्याचा हात लाऊन हवा आत जाईल अशा रितीने किमान दहा मिनिटं मळा.  


गोळा बाऊल मधे ठेवा, ओला कपडा अन ताट ठेऊन एक तास झाकून ठेवा. लक्षात ठेवा गोळा दुप्पट फुगणार आहे, तेव्हढी जागा आहे ना हे पहा. 

तासाभराने ब्रेडच्या ट्रेला तेलाचा हात फिरवून घ्या. त्याच हातांना गोळा परातीत घ्या. आता मैदा न लावता तेलाच्या हाताने गोळा पुन्हा मळा.  आता ट्रेमधे गोळा वरतून गुळगुळीत होईल असा ठेवा. ट्रेमधे हलकेच दाबून पसरवा.  


पुन्हा झाकून ठेवा. 
 50मिनिटांनी ओव्हन (ओटिजी) 230डिग्रीवर प्रिहिट करायला ठेवा.
 दहा मिनिटांनंतर  ट्रे  उघडा. गोळा फुगुन वर आला असेल . आता ट्रे ओव्हन मधे  230डिग्रीवर 15मिनिटं ठेवा. त्यानंतर  200डिग्री वर 30/35मिनिटं बेक करा.  बेक झाल्यावर ट्रे काळजीपूर्वक बाहेर काढा. अन नॅपकिनच्या सहाय्याने ब्रेड बाहेर काढून जाळीवर गार करत ठेवा.
गार झाल्यावर नागमोडी धार असलेल्या सुरीने स्लाईस करा
तयात आहे  ताजा लुसलुशीत ब्रेड




कणकेचा ब्रेड करताना फक्त पाणी कोमट घ्यावे. बाकी रेसिपी सेम

गार्लिक टेस्ट साठी : साखर, मीठ उलटे प्रमाण करून, लसूण वाटून गार्लिक ब्रेड केला

मग त्याचे स्लाईस करून चिज टाकून टोस्ट केले


No comments:

Post a Comment